७ सप्टेंबर, २०१३

भोवताल


बाप चोर, लेक चोर, खानदान चोरटी;
शानदार सूर्यवंश, फक्‍त शान चोरटी.



थंडगार स्वागतास अंगणात ठेवली,
चरण स्पर्शते लवून लॉन छान चोरटी.



आणली कुठून ही? विचारता असे कसे?
नेकलेस आमचीच,फक्‍त मान चोरटी.



मैफलीस जिंकण्यास मोकळे खुलून गा;
घेत काय बैसला गळ्यात तान चोरटी.



रात्र खूप उलटली व दूर राहिले शहर;
घ्या धकून आज हीच गावरान चोरटी.



ऐकवू नकोस तू तुझी नवी नवी गझल;
भोवताल मंडळी इथे महान चोरटी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा