दु:ख देखणे तुझे,देखणा वसंत तू;
घाव सांगतातना आजही पसंत तू.
सोसतात लोक हे लाख यातना पहा;
वागवीत बैसला काय एक खंत तू.
वाटल्यास गाळ तू लपून दोन आसवे;
भाषणा, करू नको मरण शोभिवंत तू.
येथली जमीनही नीट ना कळे तुला;
वाचतोस सारखा काय आसमंत तू.
लोचनात ओतुनी प्राण वाट पाहतो;
आणखी बघू नको फार वेळ अंत तू.
स्वर्ग छान कल्पना,मोक्ष फालतूपणा;
चालला कुठे असा शोधण्या दिगंत तू.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा