पेटले तुझ्या स्पर्शाने लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पेटले तुझ्या स्पर्शाने लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

७ सप्टेंबर, २०१३

चवदार तळ्याचे पाणी




पेटले तुझ्या स्पर्शाने चवदार तळ्याचे पाणी;
धगधगत्या संघर्षाने शब्दांना फुटली वाणी.


फाटक्या घरांच्या वस्त्या छावण्या छळाच्या होत्या;
मोडली गुलामगिरीची तू जुल्मी प्रथा पुराणी.


अबलांच्या पाठीमागे कायदा उभा तू केला;
शिवलेल्या ओठांवर मग हक्कांची आली गाणी.


रामाने काळ्या तेव्हा दारास उघडले होते;
जेव्हा तू समतेसाठी धडधडला तोफेवाणी.

(पूर्वप्रसिद्धी : ‘अस्मितादर्श’ धम्मदीक्षा सुवर्ण महोत्सवी विशेषांक २००६)