खाणीत कोळशांच्या मी शोधतो हि़-याला;
पॉलीश स्टीलचे हे प्रत्येक चेह़-याला.
शेवाळल्या नद्या अन झाले गढूळ पाणी;
आता तहान माझी सांगू कशी झ-याला?
चौफेर नांदणारे माहेर दहशतीचे;
जावे कुण्या ठिकाणी निर्धास्त आस-याला?
ऐकून शुभ्र ख्याती येऊ नका बघाया;
बंबाळ घाण येते ह्या सभ्य कोप-याला.
जखमेस न्याय आता सांगा कसा मिळावा?
सामील रक्त झाले निर्ढावल्या सु-याला!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा