९ सप्टेंबर, २०१३

भिंत


त्याच त्या झंझटी सोड तू;
फालतू बंधने तोड तू.

मी दिली सर्व बाकी तुझी;
नाव माझे अता खोड तू.

लागती फास ज्यांचे गळा;
सात शपथा अशा मोड तू.

बोलण्याचा पुरे गोडवा;
ओठ कर आपले गोड तू.

तोडल्या चौकटी मी जुन्या;
भिंत ती तेवढी फोड तू.

कुंपणाची नको काळजी;
देश माझा तुझा जोड तू.

(असंग्रहीत/प्रसिध्दी : ‘साधना’ दिवाळी अंक २००६)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा