५ सप्टेंबर, २०१३

हात


असे जीवना तू किती घात केले;
मला तू खरेदी लिलावात केले.

किती झाकल्या मी व्यथा अंतरीच्या;
उगा स्पष्ट त्यांना खुशालात केले.

तुला सांग दुःखा कसा मित्र मानू?
हवे तेवढे तू न आघात केले.

तुला एक साधे कमळ दे म्हणालो;
किती खून तू या तलावात केले.

पुरे खंडले रे अखंडत्त्व माझे;
किती खंड माझे नकाशात केले.

तुला शोभले का अरे ईश्वरा हे-
भिका-याप्रमाणे पुढे हात केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा