भरले कणीस माझे कोणी खुडून नेले?
हंगाम संपलेला पक्षी उडून गेले.
रामासमोर येथे झाल्यात वाटमा-या
-रामायणात नाही आत्ता घडून गेले.
पायात थांबलेले मुक्काम यातनांचे;
अंधारपूर आला,रस्ते बुडून गेले.
गोण्यात कातडीच्या लादून खुप ओझी;
हे पालखीत गोटे केव्हा चढून गेले?
माझ्याच अंत्ययात्रा कित्येक पाहिल्या मी-
माझेच प्रेत जेव्हा माझ्या पुढून गेले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा