९ सप्टेंबर, २०१३

डाव



नाव आता तिचे तू विचारू नको;

जीव गेल्यावरी बाण मारू नको.

भोवर्‍याने मला छान मुक्‍ती दिली;
प्रेत माझे जळा व्यर्थ तारू नको.

माझिया ऐवजी ओठ ज्या चुंबिती;
त्या बटांना गडे दूर सारू नको.

धुंद आपापली वेगळी वेगळी:
ह्यास पूजा नको, त्यास दारू नको.

पाखरांच्या पहा बैसल्या पंगती;
जहर दाण्यांवरी तू फवारू नको.

लाव डावावरी राज्य तू आपले;
द्रौपदीला परी त्यात हारू नको.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा