५ सप्टेंबर, २०१३

सत्कार


पापण्यांनी खोल केले वार तू;
सात माझे जन्म केले ठार तू.



मोहराया लागता काया तुझी;
यौवनाचे मानले आभार तू.



ह्या फुलांनी मान खाली घातली;
कोणता केला असा शुंगार तू?



सर्व साच्यातून गेलो येथल्या;
जीवनाला दे नवा आकार तू.



काल जेव्हा तोल जाऊ लागला;
लाजण्याचा घेतला आधार तू.



हासुनी तू प्राण माझा घेतला;
चुंबुनी केले किती सत्कार तू!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा