१ सप्टेंबर, २०१३

मूळ

दडपणे दूर ही साराजरासा श्वास घेऊ द्या;
नका बांधू कुणी वारा,जरासा श्वास घेऊ द्या.

जिवाची काहिली होते गुलाबाच्या,चमेलीच्या;
जरासे ऊन नाकाराजरासा श्वास घेऊ द्या.

तुझा अवतार आहे रेनसे तो रेसचा घोडा;
कधी नापास स्वीकारा,जरासा श्वास घेऊ द्या.

उभे आयुष्य काटाच्या अणीवर काढले त्यांनी,
मुखावर वाजले बारा,जरासा श्वास घेऊ द्या.

कधी तर चोपडी फेका नफा-नुकसान नोंदीची;
करा त्या बंद व्यापाराजरासा श्वास घेऊ द्या.

जिथे चौरंग सोन्याचा,छतालाही जिथे चांदी;
सदा तो बंद गाभारा,जरासा श्वास घेऊ द्या.

असे जे मूळ दु:खाचे,असे कारण वितुष्टाचे-
अपेक्षांचा नको माराजरासा श्वास घेऊ द्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा