९ सप्टेंबर, २०१३

शुभेच्छा


हा प्रश्न एकदाचा लावा धसास राजे;
टांगून ठेवलेले त्याला कशास राजे.

छातीवरील जागी कोटात छान दिसती;
फेकू नका फुलांना घेऊन वास राजे.

सांगू किती नवाई ह्या धूर्त कावळ्यांची;
ताटामधून नेती काढून घास राजे.



सेतू तसा नवा, पण हा कोसळेल केव्हा-
याचा अचूक पक्का बांधा कयास राजे.



जेवण नसेल तर मग सांगा खुशाल चुटके;
जनता सभेत बसली आहे उदास राजे.



दुष्काळग्रस्त गावे देतात ह्या शुभेच्छा-
होवो सदा सुखाचा तुमचा प्रवास राजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा