आसवांची कशी रीत आहे;
आग पाणीच लावत आहे.
घाव माझ्या उरातील बोले;
ऐकणारा म्हणे गीत आहे.
सांग बोलू कसा मी तुझ्याशी;
शब्द ओठास चावीत आहे.
फूल ज्वालांवरी झोपले जे;
नाव त्याचेच का प्रीत आहे?
पाजण्याची त-हा कोणती ही-
एक प्याला मला पीत आहे!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा